एफडीएच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

एफडीएच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Published on

थेऊर, ता.१४ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील राजधानी बेकरीच्या केकमध्ये रविवारी (ता. १० ऑगस्ट) दुपारी जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, तरीही आजपर्यंत एफडीएने काहीही कारवाई न केल्याने एफडीए प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओ पुरावे असतानाही चार दिवस लोटूनही कारवाईचा बडगा न उगारल्याने, आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
कवडी माळवाडी रस्त्यावरील राजधानी बेकरीत रविवारी एक महिला आपल्या मुलांसाठी केक खरेदी करण्यासाठी आली. घरी नेऊन केक कापताच त्यामध्ये जिवंत अळ्या वळवळताना दिसल्या. संतापलेल्या महिलेने तत्काळ बेकरीत धाव घेत ‘असले घाणेरडे पदार्थ विकता का’ असा जाब विचारला आणि लोणी काळभोर पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी कारवाई केली पण एफडीएची अद्याप डोळेझाक झाल्याने एफडीएच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पूर्व हवेलीत हडपसर,कदमवाकवस्ती,लोणी काळभोर ते उरुळी कांचन परिसरात अनेक ठिकाणी विनापरवाना बेकऱ्या उघडपणे सुरू असून त्या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. गंजलेल्या उपकरणांतून पावाचे पीठ मळणे, कालबाह्य मैदा वापरणे, निकृष्ट दर्जाचा डालडा आणि इतर घटक वापरत ही सर्व प्रक्रिया अत्यंत घाणेरड्या वातावरणात केली जाते. या बेकऱ्यांकडे ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा एफडीएचा परवाना असतो का याबाबत शंकाच असते. परवाना म्हणजे काय असतं याची या बेकरी मालकांना कल्पनासुद्धा नसते ही ग्रामीण भागातील वास्तविकता आहे.याउलट नामांकित आणि नियम पाळणारे बहुतांश बेकरी व्यावसायिक शासनाकडून परवाना घेतात, दर्जा राखतात, पण या बेकायदेशीर व्यावसायिकांवर मात्र कोणीही अंकुश ठेवताना दिसत नाही का हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते ही बाब संशोधनाची झाली आहे.


आम्ही कदमवाकवस्ती येथील राजधानी बेकरीवर कारवाई केली आहे. बेकरीचालकाकडे परवाना आहे. घडलेल्या घटनेबद्दल चौकशी सुरू असून त्याच्यावर आमच्याकडील कायदाकलम ६९ नुसार दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांनी दंड भरलेला आहे.
- नारायण सरकटे, उपायुक्त, एफडीए, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com