पिकअपची चार वाहनांना धडक

पिकअपची चार वाहनांना धडक

Published on

थेऊर, ता. १९ : पुणे- सोलापूर महामार्गावर चुकीच्या बाजूने पिकअप भरधाव वेगाने चालवून चार वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता. १८) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत, तर पाचही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
साक्षी अतुल वारके (वय २२, रा. ए-२०५ साई पार्क सोसायटी, रामदरा रस्ता, लोणी काळभोर, पुणे. मुळ रा. खडक, ता. भुसावळ, जि-जळगाव) व रश्मी राणे असे जखमी झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. पिकअप चालक दीपक रमेश बारसकर (वय ३५, रा. गुजरवस्ती कदमवाकवस्ती, ता. हवेली) याच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साक्षी वारके व रश्मी राणे या दोघी मैत्रिणी असून, लोणी काळभोरमधील एका शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. दोघी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त शेवाळवाडी येथे सोमवारी (ता. १८) गेल्या होत्या. काम आटोपल्यानंतर घरी निघाल्या होत्या. रश्मी दुचाकी चालवत होती, तर साक्षी पाठीमागे बसली होती. पुणे- सोलापूर महामार्गावरून जात असताना, त्यांची दुचाकी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जेके फर्निचर दुकानासमोर आली तेव्हा विरुद्ध बाजूला शेवाळवाडीकडे जाण्याच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या पिकअपने (एमएच १२ वायबी ६१५८) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर पिकअपने एका पांढऱ्या रंगाच्या टाटा ईडीगो मोटार (एमएच १० व्हीएम ५००६), रिक्षा (एमएच १२ डब्ल्युआर३०७६) व शाईन दुचाकी (एमएच १२ एमजे ६५८६) या गाड्यांना धडक दिली. त्यानंतर कोणतीही मदत न करता पिकअप चालक बारसकर हा घटनास्थळावरून पळून गेला.
दरम्यान, या अपघातात रश्मी हिच्या डोक्याला व मानेला जबर मार लागला आहे, तर फिर्यादी साक्षी हिच्या डोक्याला व उजव्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. तसेच इतर गाडीमधील नागरिकही जखमी झाले आहेत. याबाबत साक्षी वारके हिने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com