महिलांकडून विकासाला योग्य दिशा देण्याचे काम

महिलांकडून विकासाला योग्य दिशा देण्याचे काम

Published on

थेऊर, ता.३० : उरुळी कांचनच्या वैभवात भर टाकणारी वास्तू ग्रामसचिवालयाच्या माध्यमातून उभी करून उरुळी कांचनच्या कारभाऱ्यांनी चांगला आदर्श उभा केला आहे. महिला गावाच्या...परिसराच्या विकासाला योग्य दिशा देण्याचे काम करतात. हा आदर्श मी माझ्या आईकडून घेतला आहे. उरुळीला महात्मा गांधी, मणिभाई देसाई, दत्तोबा कांचन यांच्या कार्याचा वारसा आहे, अशी प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील नवीन ग्रामसचिवालयाच्या वास्तूचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी (ता.३१) करण्यात आले. याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे, आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी आमदार अशोक पवार, रमेश थोरात, जगन्नाथ शेवाळे, प्रदीप कंद, संदीप भोंडवे, दादा पाटील फराटे, गजानन पाटील, एस.एम.शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, शिरूर-हवेलीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार काही धोरणात्मक निर्णय घेत आहे. त्याला आम्ही जरी सत्तेत नसलो तरी चांगल्या प्रकल्पांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत. उरुळी कांचनमध्ये सर्वांनी मिळून देखणी इमारत उभी केल्याबद्दल मनापासून कौतुक करतो.

आमदार माऊली कटके म्हणाले की, देखणी इमारत बांधून उरुळी कांचनच्या जनतेला दिलासा देण्याचे काम ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी करून हवेली तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. सरकारने लोणी काळभोरपर्यंत मेट्रो मंजूर केली आहे. केंद्राकडून नव्याने रेल्वेचे टर्मिनल उरुळी कांचन येथे होणार आहे. त्यामुळे ही मेट्रोची मार्गिका उरुळीपर्यंत आणावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

यावेळी उरुळी कांचनच्या सरपंच ऋतुजा कांचन, उपसरपंच स्वप्नीशा कांचन, उरुळी कांचनचे ज्येष्ठ नेते के.डी.कांचन, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, संचालक राजाराम कांचन, यशवंत कारखान्याचे संचालक संतोष आ.कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, अजिंक्य कांचन, संतोष ह.कांचन, दत्तात्रेय कांचन, भाऊसाहेब कांचन, अमित कांचन, मयूर कांचन, प्रकाश गळवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, शरद पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी करताना सरपंच कक्षाला भेट दिली. यावेळी पवार यांना सरपंच ऋतुजा कांचन यांनी खुर्चीवर बसण्याची विनंती केली. त्या विनंतीला नकार देत पवार यांनी खुर्चीची गरीमा राखत आदराने कांचन यांना खुर्चीत बसवले.
00137

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com