भिल्ल समाजाला स्वातंत्र्यानंतर जातीचे दाखले
थेऊर, ता. १ : श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे ५० वर्षांपूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या भिल्ल समाजाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातीचे दाखले मिळाले आहेत. लोणी काळभोरच्या अतिरिक्त तहसीलदार तृप्ती कोलते पाटील व हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने हस्ते १०० भिल्ल कुटुंबांना दाखल्याचे वाटप करण्यात आले.
थेऊर येथे भिल्ल समाज अनेक वर्षांपासून मासेमारी व ढोल पथकाचा व्यवसाय करीत आहे. हा समाज दाखले मिळविण्यासाठी अनेक वर्षांपासून झगडत होता. परंतु अखेर थेऊर ग्रामपंचायत सदस्य आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे व माजी सदस्य विनोद माळी यांच्या प्रयत्नातून व आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या सहकार्याने १०० भिल्ल कुटुंबांना जातीचे दाखले देण्यात आले.
यावेळी कोलते पाटील व माने यांचे पारंपरिक वाद्य वाजवून स्वागत करत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व कुटुंबांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेही उपस्थित राहणार होते .परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत.या दाखल्यांमुळे, भिल्ल समाजातील येणारी पिढी ही,चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन,सुशिक्षित होईल.तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभही,या समाजातील कुटुंबांना मिळण्यास मदत होणार आहे असे आरोग्यदूत युवराज काकडे यांनी सांगितले.
यावेळी थेऊरचे मंडल अधिकारी किशोर जाधव, थेऊरगाव महसूल अधिकारी सरला पाटील, महसूल विभागाचे इतर अधिकारी तसेच अरुण संभाजी धारवाड, अमित धुळे, प्रशांत खांडे, सूरज सोनवणे, संग्राम गावडे, विशाल पवार, जयदीप दिवेकर, प्रकाश म्हस्के, दीपक शितोळे, रामदास बर्डे, गोवर्धन धारवाड, लहू पवार, सलीम शेख व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रिंट व डिजिटल मीडिया हवेली अध्यक्ष संदीप बोडके व सामाजिक कार्यकर्ते गणेश कुंजीर यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले. मिळालेल्या जातीच्या दाखल्यांमुळे, भिल्ल समाजातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून, आभार मानले.
00143
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.