ट्रकची दुचाकीला धडक; विद्यार्थी जखमी

ट्रकची दुचाकीला धडक; विद्यार्थी जखमी

Published on

थेऊर, ता. ७ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक (क्र. एमएच ४३ सी के ९७२०)ने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने सोरतापवाडीतील विद्यार्थी जखमी झाला आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ज्युडीओसमोर शनिवारी (ता.६) पहाटे दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रकचालकावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषीकेश राजेंद्र चौधरी (वय २५, रा. सोरतापवाडी, ता.हवेली) असे जखमी झाला असून त्यानेच फिर्याद दिली आहे. तर राजेंद्र बाबासाहेब गर्जे (वय ३४, रा. खिळद, ता.आष्टी, जि. बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com