पुणे
कुंजीरवाडीतील लॉजवर परित्यक्ता महिलेवर बलात्कार
थेऊर, ता. ७ : पतीपासून अलिप्त राहत असलेल्या परित्यक्ता महिलेशी शादी डॉट कॉम साइटवर ओळख केली. त्यानंतर एकांतात बोलण्याच्या बहाण्याने भेटण्यास बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका लॉजवर २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. तसेच वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आरोपीने महिलेला धमकी दिल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात चंद्रकांत दिनकर थोरात (वय ३०, चाकण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय पीडितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.