कदमवाकवस्तीत महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

कदमवाकवस्तीत महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

Published on

थेऊर, ता. १३ : मोटारसायकल अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा जाब विचारल्याने महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना कदमवाकवस्ती(ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परिसरात नुकतीच घडली आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तुषार ऊर्फ बाळ्या रावसाहेब काळभोर (रा.आष्टापुरेमळा, कदमवाकवस्ती,ता.हवेली) याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २९ वर्षीय विवाहित महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास साहाय्यक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले करत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com