उरुळीतील चाकू हल्ला प्रकरणातील जखमीचा मृत्यू
उरुळी कांचन, ता. १ : माझ्या दुकानापुढे गोंधळ घालत बसत जाऊ नका, असे म्हणाल्याच्या कारणावरून चाकूने हल्ला करून जखमी केलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभाकर नारायण तुपे यांचा उपचारादरम्यान रविवारी (ता. ३०) मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन गावच्या हद्दीत तुपेवस्ती परिसरात मंगळवारी (ता. २५) प्रिन्स जनरल स्टोअर्सच्या समोर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी स्वप्नील बाळू ओव्होळ (वय २५, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) याला अटक केली आहे. प्रभाकर तुपे यांनी तुम्ही दुकानापुढे गोंधळ घालत बसत जाऊ नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपी ओव्होळ याने शिवीगाळ करीत दमदाटी करून तुपे यांच्यावर धारदार चाकूने पोटात, तसेच हातावर वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (ता. ३०) मृत्यू झाला.
या घटनेतील आरोपी ओव्होळ हा फरार झाला होता. शनिवारी (ता. २९) तो पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, गुन्हा घडलेल्या परिसरातून महात्मा गांधी विद्यालय रस्ता, तळवाडी, पुणे- सोलापूर रस्त्यावरून उरुळी कांचन पोलिस ठाण्यापर्यंत धिंड काढली होती. त्याला न्यायालयात हजर केल्यावर तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. सोमवारी (ता. १) खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केल्यानंतर आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास एपीआय ज्ञानेश्वर बाजगिरे करत आहेत.
00445
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

