अष्टापूर ढाशीत फूल, अष्टचंदनाची उधळण
उरुळी कांचन,ता. ८ : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषाने फुलांची व अष्टचंदनाची उधळण करीत अष्टापूर ढाशी येथे गुरुवारी दत्तजन्म सोहळा उत्साहात साजरा झाला.
दत्तचरणरज ओंकार मोहन कांचन महाराज यांच्या आधिपत्याखाली सुरुवातीला गुरुचरित्र पारायण व नंतरचे तीन दिवस ब्रह्म, विष्णू व शिवदत्त यज्ञ व दत्तजन्म सोहळा, ग्राम प्रदक्षिणा, विविध पारंपरिक कीर्तने, देवीचा जागर, कुलदैवताचे जागरण गोंधळ असा सलग पाच दिवस हा सोहळा गुरुतीर्थावर दत्तजन्म सोहळा पार पडला. १९६ भक्तांकडून त्रैदिनीय श्री गुरुचरित्र पारायण सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काकड आरती, दत्त महाराजांच्या मुख्य मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. प्रकाश साठे महाराज (बीड) यांचे कीर्तन व त्यानंतर महाआरती करण्यात आली. तिसऱ्या दिवशी श्री चक्र अभिषेक व पूजन शिवदत्त याग झाला. चौथ्या दिवशी श्री दत्तजन्मा अगोदर दत्तचरणरज ज्योतिषाचार्य ओंकार मोहन कांचन महाराज यांचे दत्तजन्मावर प्रवचन झाले. त्यानंतर अष्टचंदन व फुलांचे वाटप, पाळणा, नाव ठेवणे, देव भेट करत शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसेच सुंठवडा प्रसाद वाटप व अन्नदान महाप्रसाद भंडारा भक्तांना देण्यात आला. पाचव्या दिवशी उरुळी कांचन येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर ते दत्त मंदिर अशी पारंपरिक हलगीच्या तालावर तसेच ढोल-ताशाच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा पालखी सोहळा पार पडला. यावेळी ग्रामस्थ पाद्यपूजा करत होते. शेवटच्या दिवशी महाआरती करून घुगऱ्यांचा प्रसाद व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या पाच दिवसांमध्ये परिसरातून भक्तमंडळी व राजकीय मंडळींनी सद्गुरूंचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
0479
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

