उरुळी कांचनची विशेष ग्रामसभेत ‘गोंधळ’

उरुळी कांचनची विशेष ग्रामसभेत ‘गोंधळ’

Published on

उरुळी कांचन ग्रामपंचायतीचा ग्रामसभा तहकूब करण्याचा किंवा गोंधळात उरकण्याचा इतिहास हा नवा नाही. त्या प्रथेला धरूनच आजची अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलावलेली ग्रामसभा दोन गटातील गोंधळामुळे आणि श्रेय वादामुळे विषय पत्रिकेवरील विषयांवर आणि बहुसंख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या समस्यांवर कोणतीही सखोल चर्चा न करता मंजूर मंजूरच्या घोषणेत संपली.
ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे यांनी कार्यकारी मंडळाचा सचिव या नात्याने सभेला सुरुवात करून, विषय पत्रिकेवरील पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे हा पुकारून उपस्थितांपुढे चर्चेला ठेवला. माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य संतोष ह.कांचन यांनी त्यांना १८ नोव्हेंबरच्या अगोदरच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षांची निवड झाली का? त्याबाबतचे इतिवृत्त वाचावे असा आग्रह धरला व गोंधळाला सुरुवात झाली. त्यावर ग्रामपंचायत अधिकारी ठाम उत्तर देऊ शकले नाहीत, शेवटी संतोष ह.कांचन यांनी त्यांना विचारले तुम्ही निवड झाल्याचे अधिकृत पत्र दिले का? त्याला उत्तर देताना ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश गळवे यांनी सांगितले की पत्र दिले नाही. त्यानंतर १८ नोव्हेंबरच्या ग्रामसभेनंतर उरुळी कांचन येथे निवासी मिळकत धारक थकबाकीदार ग्रामस्थांना घरपट्टी,पाणीपट्टी व वीज करात शासनाच्या धोरणानुसार दिल्या जाणाऱ्या ५० टक्के थकबाकी माफीची सवलत नाकारण्याचा विषय अतिशय प्रकर्षाने चर्चेत होता. त्या विषयाला उपस्थितांनी हात घातला आणि गोंधळातच माजी उपसरपंच संचिता कांचन यांनी ५० टक्के थकबाकी सवलत देण्याबाबत मांडलेल्या ठरावाला माजी उपसरपंच रामभाऊ तुपे यांनी अनुमोदन देत हा विषय गोंधळातच मंजूर करत सभाध्यक्ष सरपंच मिलिंद जगताप यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे आणखी गोंधळ वाढला कारण बऱ्याच नागरिकांच्या समस्या, त्यांचे अर्ज याठिकाणी चर्चेला घेण्याची अपेक्षा होती; परंतु सरपंचांनी गोंधळात सभा संपल्याचे जाहीर केल्याने नागरिकांच्या समस्या अनिर्णितच राहिल्या.

उपसरपंचांसह आठ सदस्य गैरहजर
विशेष ग्रामसभेला सभेला उपसरपंचासह ८ सदस्य गैरहजर होते.सचिन काळे,संदीप कांचन,संतोष बगाडे,सविता कांचन,काळूराम मेमाणे,विजय मुरकुटे,राजेंद्र बोरकर आदींनी सभागृहात चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
0569

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com