सोरतापवाडी येथे उद्या महाआरोग्य शिबिर

सोरतापवाडी येथे उद्या महाआरोग्य शिबिर

Published on

उरुळी कांचन, ता. १ : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील शांताई मंगल कार्यालय येथे परिसरातील नागरिकांसाठी बळिराजा मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. हे शिबिर शनिवारी (ता.३) सकाळी ९ ते ४ या वेळेत होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि लक्ष फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांच्या शिबिर भरवण्यात येणार आहे. शिबिरामध्ये तपासणी ते शस्त्रक्रिया सर्व गोष्टी विनामूल्य केल्या जाणार आहेत. यासाठी रूबी हॉल क्लिनिक, जहाँगीर हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल यांच्या सह सुमारे ४० मोठी हॉस्पिटल्स सहकार्य करणार आहेत अशी माहिती संयोजक सुदर्शन चौधरी यांनी दिली.
शिबिरामध्ये एक्स-रे, २डी इको, सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी यासारख्या महागड्या तपासण्या तसेच रक्ताच्या सर्व चाचण्या विनामूल्य केल्या जातील, सर्व उपचार व शस्त्रक्रिया यादेखील मोफत करण्यात येणार आहेत. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सुदर्शन चौधरी यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com