एमआयटी एडीटी विद्यापीठाला 
‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार

एमआयटी एडीटी विद्यापीठाला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार

Published on

उरुळी कांचन, ता. ५ ः एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठ, राजबाग लोणी काळभोर, पुणेला डीएफएलचा प्रतिष्ठेचा ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान विद्यापीठाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड यांनी स्वीकारला.
डिफेन्स फोर्स लीग (डीएफएल)आणि डीआयएफटी फाउंडेशन यांच्या वतीने ‘आपल्या सैन्याला समजावून घ्या’ या संकल्पनेवर आधारित आणि ‘वॉल ऑफ हिरोज’ या जागतिक विक्रमी मोहिमेच्या अधिकृत प्रारंभासाठी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘डिव्हाईन एव्हिएशन एज्युकेशन अँड कल्चर समिट’मध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार नुकत्यात झालेल्या राष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला.
माजी हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. अरुणाचल प्रदेश व मिझोरामचे राज्यपाल तसेच इंडियन एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष एअर मार्शल शशीकुमार रामदास यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमात उपस्थितांना लाभले.
या प्रसंगी नागरी विमान वाहतूक उपमहासंचालिका सुवरिता सक्सेना, मिग–२१ विमानावर सर्वाधिक उड्डाण तासांचा जागतिक विक्रम करणारे एअर कमोडोर सुरेंद्र त्यागी तसेच भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते व पद्मश्रीने सन्मानित मुरलीकांत पेटकर उपस्थित होते.
परिषदेच्या प्रारंभी १९७१च्या युद्धातील शहीदांसह भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी एअर मार्शल भूषण गोखले यांना एनसीसी कॅडेट्सकडून विशेष गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. याच मंचावर डीएफएल आणि डीआयएफटी फाउंडेशनतर्फे भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथांना समर्पित‘वॉल ऑफ हिरोज’ही महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मोहीम अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com