चौपाटी राजा कुप्रसिद्ध नावाच्या अट्टल गुन्हेगाराला अटक
थेऊर,ता. ७ : दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणारा व जबरी चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी, ‘बचक्या’ टोळीतील सराईत व ‘चौपाटी राजा’ या नावाने कुप्रसिद्ध असणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाईन्स जवळून अटक केली आहे.
राजेश ऊर्फ चौपाट्या बबलू मंगल मंडळ (वय २९, सध्या रा.पठारे वस्ती,कदमवाकस्ती ता.हवेली,मूळ रा. दरभंगा, बिहार राज्य) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश मंडळ या अट्टल गुन्हेगारावर बंड गार्डन पोलिस ठाण्यात ६, लष्कर व विश्रामबाग पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे ८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुन्हे शाखेचे पथक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार नितीन मुंढे यांना एका खबऱ्यामार्फत ‘चौपाटी राजा’ नावाने कुप्रसिद्ध असलेला गुन्हेगार पुणे-सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाईन जवळ थांबला आहे , अशी माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. राजेश मंडळ हा ‘चौपाटी राजा’ नावाने दरोडा,खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मोबाईल चोरी करणारी सराईत ‘बचक्या’ टोळीशी संबंधित असून सध्या तो मोक्का गुन्ह्यात जामिनावर होता. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पुढील कारवाईसाठी बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, साहाय्यक आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण, साहाय्यक निरीक्षक मदन कांबळे, पोलिस अंमलदार कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, कॉप्स २४ मार्शल अंमलदार तुळशीदास जाधव व महेंद्र आगळे, सारंग दळे,प्रशांत कापुरे, नीलेश साळवे, गिरीश नाणेकर, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

