प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या 
संचालक मंडळावर गुन्हा दाखल

प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल

Published on

उरुळी कांचन, ता. ९ : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रियदर्शनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर महाराष्ट्र सहकारी सोसायटी अधिनियम १९६०अंतर्गत कलम १४२ (ग) अन्वये उरुळी कांचन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या पतसंस्थेच्या लेखापरीक्षणासाठी नियुक्त केलेल्या व अप्पर विशेष लेखापरीक्षक वर्ग (२), सहकारी संस्था, स्वारगेट, पुणे यांच्या अधीनस्त असलेल्या लेखा परीक्षक अस्मिता प्रकाश पंडित (वय ४४, रा. थेरगाव, पुणे ३३) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, प्रियदर्शनी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव, सर्व संचालिका व व्यवस्थापक यांच्यावर संस्थेचे दप्तर लेखापरीक्षणास उपलब्ध करून न दिल्याबद्दल व ठेवीदारांच्या ठेवी परत न दिल्याबद्दल ठपका ठेवून आणि ठेवीदारांच्या तक्रारीला अनुसरून लेखापरीक्षक या नात्याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रंजना बाळासाहेब शिवरकर (अध्यक्षा, रा. रेल्वे स्टेशनजवळ, तुपे वस्ती, उरुळी कांचन), हेमलता बाळासाहेब बडेकर (रा. बडेकर नगर, तुपे वस्ती, उरुळी कांचन), रंजना साहेबराव खेडेकर (सचिव, रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन), जयश्री जयप्रकाश बेदरे (संचालिका, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन), चंद्रलेखा जनार्दन मसाले (संचालिका, रा. डाळिंब- दत्तवाडी, ता. दौंड), शोभा पुंडलिक शिवरकर (संचालिका, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, सुनीता एकनाथ काळे (संचालिका, रा. शिंदवणे रोड, तळवाडी, उरुळी कांचन), ज्योती सुरेश धुकटे (संचालिका, रा. उरुळी कांचन), निलम नरेंद्र काटे (संचालिका, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन), निलोफर हमजू सय्यद,(संचालिका, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन), सुरेखा राजेंद्र कांचन (संचालिका, रा. उरुळी कांचन), विजय भागचंद तलरेजा (व्यवस्थापक, रा. दातार कॉलनी, उरुळी कांचन) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या सर्वांनी २१ जुलै २०२५ ते ०७ जानेवारी २०२६ पर्यंत संस्थेचे दप्तर तपासणीसाठी वारंवार पत्रव्यवहार करीत मागूनही न दिल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मीरा मटाले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com