थेऊरमध्ये विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
थेऊर, ता. १८ : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती भाऊ युवराज राखपसरे, दादा भीमा लोंढे, लक्ष्मण भीमा लोंढे, सीमा दादा लोंढे आणि कविता सुनील लोंढे (सर्व रा. थेऊर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २३ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह २४ मे २०२०ला झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत असताना गरोदरपणात सासरच्यांनी संशय घेण्यास सुरुवात केली. मुलगी झाल्यानंतर छळ अधिक वाढला. पतीचे अन्य महिलांशी असलेले प्रेमसंबंध उघड झाल्याने जाब विचारला असता, पीडितेला बेदम मारहाण करण्यात आली. फेब्रुवारी २०२५ मध्ये जत्रेत पती दुसऱ्या तरुणीसोबत दिसल्याने वाद झाला. त्यानंतर १२ डिसेंबर २०२५ला देवकार्यावेळी नातेवाईकांनी दिलेल्या खोट्या माहितीवरून पतीने पीडितेला मारहाण केली व सर्वांनी मिळून तिला मुलांसह घराबाहेर हाकलून दिले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

