दोन महिन्यांपासून फरार आरोपीला अटक

दोन महिन्यांपासून फरार आरोपीला अटक

Published on

थेऊर, ता. २३ : थेऊर-कोलवडी रस्त्यावर एका कुटुंबातील चार जणांना बेदम मारहाण करून दोन महिने फरार असलेल्या मुख्य आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद धनाजी सोनवणे (रा. थेऊर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ डिसेंबर २०२५ला रात्री ८ ते १० च्या सुमारास तनिष्का गणेश नायक (रा. मांजरी बुद्रुक) या आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून जात असताना, आरोपींनी श्री चिंतामणी विद्यामंदिरसमोर त्यांची वाट अडवली. अक्षय सोनवणे, प्रसाद सोनवणे आणि बकासुर यांनी फिर्यादीसह त्यांच्या सासू व नणंदेला लाकडी पट्टीने मारहाण केली. तसेच दगड मारून तनिष्का यांना जखमी केले होते.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली होती, मात्र प्रसाद सोनवणे पोलिसांना चकवा देत होता. अखेर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, रत्नदीप बिराजदार व पथकाने सापळा रचून त्याला थेऊर परिसरातून ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करत आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी तिघांना अटक केली होती. मात्र, प्रसाद सोनवणे हा तेव्हापासून फरार होता.अ खेर पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला थेऊर परिसरातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, रत्नदीप बिराजदार, पोलिस हवालदार दिगंबर जगताप, पोलिस अंमलदार अमोल जाधव व त्यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com