आरटीई प्रवेशासाठी अंतराची अट रद्द करण्याची मागणी
उरुळी कांचन, ता. ३ ः आरटीई प्रवेशासाठी राहत्या घरापासून फक्त एक किलोमीटर अंतरातील शाळा निवडण्याच्या अटीमुळे काही गावे व वाड्या, वस्त्यांवरील पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. राज्य सरकारने नव्याने राहत्या घरापासून एक किलोमीटर अंतर हा मापदंड ठेवल्याने काही गावे वाड्या-वस्त्या या अंतरात न येण्याने त्या गावातील आरटीई प्रवेशासाठी पात्र ठरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार या नियमाने बाधित होणारे पालक करत आहेत.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई प्रवेशासाठी २५% आरक्षित जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. १० मार्च ही अंतिम तारीख असताना शासनाने मागील वर्षी पर्यंत असलेली तीन किलोमीटर परिघातील शाळांची निवड ही अट बदलून राहत्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील शाळांमध्येच प्रवेश घ्यावा लागेल ही अट लागू केल्यामुळे, अनेक गावांमधील, वाड्या, वस्तीमधील विद्यार्थी या परिघाच्या अंतरात येत नसल्याने आरटीई साठी फॉर्म भरण्यापासून वंचित राहत आहेत. एक किलोमीटर परिसरात इंग्रजी शाळा नसल्यामुळे अनेक पालकांचा हिरमोड झाला आहे. यामुळे एक किलोमीटरची काढून टाकून शासनाने पूर्ववत तीन किलोमीटर अंतराची अट लागू करून अन्याय दूर करण्यासाठी मदत करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.
८६५१ शाळांमधील सुमारे १ लाख १२ हजार ७७२ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. परंतु या जाचक अटीमुळे २८ फेब्रुवारीपर्यंत केवळ १ लाख २३ हजार ७३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यंदा पुणे जिल्ह्यात ९०५ शाळांमधील १७ हजार ५०९ जागांसाठी २३, ६३५ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या नियमावलीत बदल केला. बहुतांश पालक हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी उत्सुक आहेत, परंतु घरापासून एक किलोमीटर अंतरावरील शाळेत प्रवेश देण्याबाबत नियम केल्यामुळे अनेक पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

