देसाई महाविद्यालयात 
वेब डेव्हलपमेंट कार्यशाळा

देसाई महाविद्यालयात वेब डेव्हलपमेंट कार्यशाळा

Published on

उरुळी कांचन, ता. ९ : येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या संगणक विभागाच्या वतीने “बूटस्ट्रॅप तंत्रज्ञान वापरून वेब डेव्हलपमेंट” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्‍घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमासाठी एलिट सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी पंजाला हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना चालना मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांनी केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना वेब डेव्हलपमेंटचे महत्त्व समजावून सांगत एचटीएमएल, सीएसएस आणि बूटस्ट्रॅपच्या सहाय्याने आकर्षक व प्रतिसादक्षम वेबसाइट तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना स्वतःची वेबसाइट तयार करण्यास सक्षम होण्यासाठी स्वामी पंजाला यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संगणक विभाग प्रमुख प्रा. वैशाली चौधरी, प्रा. प्रतीक आढाव तसेच कार्यशाळेचे समन्वयक प्रा. हर्षल भोसले, प्रा. मयुरी शितोळे, प्रा. गौरव टिळेकर, प्रा. ऋतुजा कुंभार, प्रा. प्राजक्ता थोरात, प्रा. अनुजा शिंदे, प्रा. केतकी साळुंखे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पायल खाचणे व प्रांजल लेचरूड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com