बकोरी देवराई वनराई प्रकल्प वणव्यांमुळे धोक्यात

बकोरी देवराई वनराई प्रकल्प वणव्यांमुळे धोक्यात

Published on

उरुळी कांचन, ता. १४ ः पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात बकोरी, केसनंद व वाडेबोल्हाई परिसरात सुमारे १००० एकर क्षेत्रावर वनविभाग व गायरान जमिनीचा विस्तृत पट्टा आहे. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून माहिती सेवा समिती व स्थानिक पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. बकोरी येथे बकोरी देवराई वनराई प्रकल्पा अंतर्गत सातत्याने वृक्षारोपण केले जात असून केसनंद येथेही स्थानिक पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात आली आहेत.
दरवर्षी या परिसरात अज्ञात समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक वणवे लावले जात आहेत. या आगींमुळे हजारो झाडे, लहान रोपे, पशुपक्षी आणि सरपटणारे प्राणी जळून खाक होत आहेत. बकोरी देवराई वनराई प्रकल्प परिसरात माहिती सेवा समितीच्या माध्यमातून आग पसरू नये म्हणून जाळ पट्टे (Fire Line) तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी सुदैवाने वनराईच्या मुख्य भागात आग पोहोचलेली नाही. मात्र परिसरातील इतर सुमारे ५० डोंगर आगीमुळे जळून खाक झाल्याची धक्कादायक परिस्थिती आहे.
आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठी चंद्रकांत वारघडे, धनराज वारघडे, वृक्षमित्र गणेश जाधव, कमलेश बहिरट तसेच वाघोली येथील अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक वेळा आग आटोक्यात येते; परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर वनसंपत्तीचे नुकसान झालेले असते.
पर्यावरण संवर्धनासाठी हजारो स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक झटत असताना काही समाजकंटकांकडून होणारी ही हानी थांबवण्यासाठी सरकारने तातडीने कठोर आणि प्रभावी निर्णय घेणे ही काळाची गरज असल्याची भावना माहिती सेवा समिती व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


उपाययोजना
-वणवे लावणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई
-जंगल व डोंगर परिसरात सीसीटीव्ही व देखरेख व्यवस्था
-स्थानिक स्वयंसेवक व ग्रामस्थांना प्रशिक्षण
-फायर वॉच पथके तयार करणे.
-वनविभाग, ग्रामपंचायत व सामाजिक संस्थांच्या संयुक्त समन्वयातून वणवे रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणे.
-वणव्यांमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करून संरक्षणात्मक उपाययोजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com