अमली पदार्थ मिश्रित पानांच्या विक्रीचा पर्दाफाश

अमली पदार्थ मिश्रित पानांच्या विक्रीचा पर्दाफाश

Published on

उरुळी कांचन, ता. १५ : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे अंमली पदार्थ मिश्रित पानांची विक्री करणाऱ्या ‘मैफिल पान शॉप’वर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ ने ही कारवाई केली. याप्रकरणी दुकान मालक निशांत दत्तात्रय काळभोर (वय १९, रा. लोणी काळभोर) आणि कामगार रामजी संतोष पटेल (वय ३३, रा. कदमवाकवस्ती) यांना अटक करण्यात आली आहे, तर रोहित जवळकर (रा. लोणी काळभोर) हा फरार आहे. आरोपींविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी भ्रमणध्वनी अमली पदार्थ चाचणी यंत्रच्या सहाय्याने तपासणी केली. यात खाण्याच्या पानांमध्ये ॲम्फेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स आणि ओपिएट्स यांसारख्या घातक अंमली पदार्थांचे मिश्रण आढळले. ही पाने २० ते ३५ रुपयांना विकली जात होती. शैक्षणिक संस्था आणि वसतिगृह परिसरात अशा दुकानांचे जाळे पसरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा व्यवसाय फोफावत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


मैफिल पान हाऊसवर कारवाई करून अंमली पदार्थ जप्त केले आहेत. अशा अवैध विक्रीविरोधात आमची मोहीम यापुढेही अधिक तीव्र राहील.
- पंडित रेजीतवाड, पोलिस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. २

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com