मुळा-मुठा नदीपात्रात कचराकोंडी कायम
उरुळी कांचन, ता. १८ : मुळा-मुठा नदीपात्रात बेकायदेशीरपणे कचरा टाकण्याविरोधात एमआयटी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे ''कचरा बंद'' आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे. यामुळे लोणी-काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
विद्यार्थ्यांनी १३ मार्चपासून कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांना मज्जाव केल्याने हा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, भूमी अभिलेख विभागाने मोजणीअंती कचरा टाकला जाणारी जागा (गट क्र. ११३) नदीपात्रातच असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने कचरा हडपसर प्रकल्पाकडे पाठविण्याचा ठराव केला, मात्र लोणी-काळभोरची ग्रामसभा कोरमअभावी तहकूब झाली. प्रशासकीय स्तरावर बैठका होऊनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही दोन्ही ग्रामपंचायतींना नोटीस बजावून सात दिवसांत स्पष्टीकरण मागवले असूनही निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नदीपात्रात कचरा टाकणे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. या गंभीर प्रश्नावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने ग्रामसभेत सर्वानुमते घेतलेले ठराव अत्यंत स्तुत्य आहेत. लोणी-काळभोर ग्रामपंचायतदेखील या प्रश्नी लवकरच सामंजस्याची भूमिका घेऊन ग्रामसभा आयोजित करून पर्यायी व्यवस्था करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
- डॉ. महेश चोपडे, कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी-काळभोर
एमआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांचा वापर करून आंदोलन घडवून आणले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी संयम बाळगला. एमआयटीचा कचराही नदीपात्रात टाकण्यात येतो. गावचा नदीपात्राकडे जात असलेला रस्ता गायब आहे व संस्थेने ओढ्यावर अतिक्रमण केले आहे.
- प्रशांत काळभोर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, हवेली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

