गॅस बुकिंगचा कालावधी कमी करण्याची मागणी
उरुळी कांचन, ता. १९ : आखाती देशांतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून, हवेली तालुक्यात गॅस सिलिंडरसाठी ४५ दिवसांचा बुकिंग कालावधी निश्चित करण्यात आला आहे. हा कालावधी २५ दिवसांपर्यंत कमी करावा, अशी मागणी उरुळी कांचनचे माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे.
मध्य-पूर्व आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरी भागात २५ दिवस, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांचा बुकिंग कालावधी निश्चित केला आहे. हवेली तालुक्याचे पूर्णतः शहरीकरण झाले असूनही येथे ग्रामीण भागाचे निकष लावले जात आहेत. यामुळे नोकरदार, शिक्षक आणि कामगार वर्गाला गॅस सिलिंडरसाठी दीड महिना प्रतीक्षा करावी लागत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
हवेली तालुका हा पुणे शहरालगतचा निमशहरी भाग आहे. येथील लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण पाहता, या भागाला शहराचे निकष लावून बुकिंग कालावधी २५ दिवस करावा, असे निवेदन तुपे यांनी प्रशासनाला दिले आहे. सध्या गॅसअभावी नागरिकांना मिळेल त्या ठिकाणाहून सिलिंडर मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

