

उरुळी कांचन, ता. ३१ : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिवशक्ती टायर्स दुकानासमोर पुणे–सोलापूर महामार्गावर दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने आलेल्या मोटारने धडक दिली. या धडकेत परिक्षेचा पेपर देऊन दुचाकीवरून घरी परतत असलेले हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मोटारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
हा अपघात शुक्रवारी (ता. २७ मार्च) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये तेजस संतोष साळुंखे (वय २१) व त्याचा मित्र अभय पांडे (वय २१) हे जखमी झाले. या प्रकरणी तेजसचे काका संभाजी सुरेश साळुंखे (वय ३७, मांजरी खुर्द, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
या अपघातात तेजसच्या उजव्या हाताच्या पंजाला खोल जखम झाली असून चेहऱ्याच्या उजव्या बाजूस फ्रॅक्चर, छातीला मार तसेच डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्याचा मित्र अभय याच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर व डोळ्याच्या वर जखम झाली. तेजसची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील जहांगीर रुग्णालयात हलविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.