

उरुळी कांचन, ता. १ : येथे बेकायदेशीररीत्या गांजा विक्री करणाऱ्या फिरोज महमद शेख (वय ३०, सध्या रा. स्वयंभू सोसायटी, फ्लॅट क्र. ४०६ ढमढेरे कॉलनी, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ८७३ ग्रॅम गांजा आणि वजनकाटा असा एकूण १६ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तुपे वस्ती येथील ''स्वयंभू सोसायटी''मध्ये गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने २३ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास छापा टाकला. फ्लॅट नंबर ४०६ मध्ये आरोपी फिरोज शेख हा गांजासह सापडला. पोलिस शिपाई सुमीत वाघ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.