अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई

अवैध मुरूम वाहतुकीवर कारवाई
Published on

उरुळी कांचन, ता. ६ : सोरतापवाडी फाटा (ता. हवेली) येथे बेकायदा मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरवर हवेली महसूल प्रशासनाने सोमवारी (ता. ६) दंडात्मक कारवाई केली. शुक्रवारी (ता. ३) झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
सोरतापवाडी फाट्याजवळ शुक्रवारी (ता. ३) झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी अवैध वाहतुकीवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उरुळी कांचनच्या मंडळ अधिकारी माधुरी बागवे, ग्राममहसूल अधिकारी प्रियांका सुंदरडे व पथकाने सोमवारी मुरुमासह एक डंपर ताब्यात घेतला. हा डंपर जप्त करून लोणी काळभोर येथील अतिरिक्त तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून, त्यावर महसूल कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

प्रादेशिक परिवहन विभागही ॲक्शन मोडमध्ये
पुणे-सोलापूर महामार्गावर नियम धाब्यावर बसवून धावणाऱ्या अवजड वाहनांवर आता पुणे प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) लक्ष ठेवणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर मोठ्या स्वरूपात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com