

उरुळी कांचन, ता. १४ : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे छोटे व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महावितरणने वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी व्यापारी व शेतकरी करीत आहेत.
येथे सकाळी सात ते अकरा या वेळेत सहा ते सात वेळा वीज खंडित होत आहे. यामुळे पिठाची गिरणी, लॉंड्री, सायबर कॅफे आणि बँकिंग सेवा विस्कळीत झाल्या आहेत. वारंवार वीज गेल्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होत असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वीज बिल वसुलीत तत्परता दाखवणारे महावितरण सेवा देण्यात मात्र कुचकामी ठरत असल्याची टीका नागरिक करत आहेत.
याबाबत उरुळी कांचनचे सहाय्यक अभियंता तुषार व्होनमाने म्हणाले, ‘‘यवत सबस्टेशनवरून ३३ केव्हीऐवजी केवळ २६-२७ केव्ही वीजपुरवठा होत आहे. उन्हाळ्यामुळे मागणी वाढल्याने ही समस्या निर्माण झाली असून, पर्यायी मार्गाने वीज उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.