थेऊर येथे विविध दाखल्यांचे वाटप

थेऊर येथे विविध दाखल्यांचे वाटप
Published on

थेऊर, ता. ४ : महसूल विभागाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत थेऊर (ता. हवेली) येथे आयोजित समाधान शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमात विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्याने शेकडो प्रकरणांचा जागीच निपटारा झाला.
येथील आशीर्वाद बॅक्वेट हॉलमध्ये पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकाराने आणि अतिरिक्त तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी महसूल, पोलिस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख आणि महावितरण यांसारख्या विविध विभागांचे अधिकारी येथे उपस्थित होते.
शिबिरात उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, सातबारा उतारा, वारस नोंद, ई-मोजणी आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अर्जांवर कार्यवाही करण्यात आली. काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमास पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, अतिरिक्त गटविकास अधिकारी शिवाजी नागवे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व महसूल कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या सेवा थेट दारी आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

01100

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com