चैतन्य पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनायक तांबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चैतन्य पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनायक तांबे
चैतन्य पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनायक तांबे

चैतन्य पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनायक तांबे

sakal_logo
By

ओतूर, ता. १२ : येथील चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विनायक तांबे व उपाध्यक्षपदी अमोल घोलप यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अनिता यंदे यांनी दिली.
चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीबाबत पहिली सभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिता यंदे अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक मंडळाचा सत्कार गंगाराम डुंबरे व तुषार थोरात यांचे हस्ते केला.