डिंगोरे येथे विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांविषयी माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिंगोरे येथे विद्यार्थ्यांना
शास्त्रज्ञांविषयी माहिती
डिंगोरे येथे विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांविषयी माहिती

डिंगोरे येथे विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांविषयी माहिती

sakal_logo
By

ओतूर, ता. २८ : डिंगोरे (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ, ओतूर संचलित पुष्पावती विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व विज्ञान शिक्षक व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल डुंबरे हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून वैभव देशमुख यांनी शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या वेळी विद्यालयाच्या परी भिसे, कृतिका आमले, अनुष्का शेरकर, तनुष्का दुधवडे, अनुराधा आमले, तनिष्का भिसे, दर्शिल लोहोटे, आदिती डुंबरे आदी विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाविषयी माहिती दिली. या प्रसंगी रतिलाल बागूल यांनी प्रास्ताविक, विठ्ठल शितोळे यांनी सूत्रसंचालन केले तर दिनेश पाटील यांनी आभार मानले.