कवठे येमाई यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून कार्यक्रमांची रेलचेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कवठे येमाई यात्रोत्सवानिमित्त
सोमवारपासून कार्यक्रमांची रेलचेल
कवठे येमाई यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून कार्यक्रमांची रेलचेल

कवठे येमाई यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून कार्यक्रमांची रेलचेल

sakal_logo
By

ओतूर, ता. १९ ः येथील श्री कवठे येमाई यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, भव्य कीर्तन महोत्सवाचेही आयोजन केल्याची माहिती श्री कवठे येमाई यात्रा कमिटीच्या संयोजकांनी दिली.

ओतूर येथील श्री कवठे येमाई यात्रोत्सवानिमित्त सोमवार (ता.२०)पासून कीर्तन महोत्सवाने यात्रेची सुरुवात होणार आहे. २० ते २७ मार्च या कालावधीत हभप दयानंदमहाराज भोसले (पुणे), हभप राजेंद्रमहाराज सदगिरे (संगमनेर), हभप भीमराजमहाराज हांडे (आळंदी देवाची), हभप जयेशमहाराज भाग्यवंत (डोंबिवली), हभप जगन्नाथमहाराज पाटील (भिवंडी), हभप आरतीताई महाराज मगर (टिटवाळा), हभप ज्ञानेश्वरमहाराज जळकेकर (जळगाव) यांची कीर्तन सेवा होणार असून, हभप बाळकृष्णमहाराज गडकर (कराड) यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

रात्री कोमल करण पाटोळे (मेंढापूरकर) सह बबन (अप्पा) नेहतराव पंढरपूरकर यांचा जागरण गोंधळ व देवीच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे, तसेच मंगळवार (ता.२८) रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून, मांडव डहाळे सजावट स्पर्धा, चोळी पातळ, भजन महोत्सव, शेरण्या वाटप, जागरण गोंधळ, देवीच्या गीतांचा कार्यक्रम इत्यादी विविध कार्यक्रम होणार आहेत.

विविध कार्यक्रमांचे आयोजन ओतूर ग्रामपंचायत, जय बजरंग सेवा गणेश मंडळ, श्री कवठे येमाई काकडा भजन मंडळ, श्री कवठे येमाई महिला हरिपाठ मंडळ आदींनी केले आहे.
----------------