Tue, March 28, 2023

ओतूर येथे अपघातात
दुचाकीस्वार तरुण ठार
ओतूर येथे अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार
Published on : 19 March 2023, 3:26 am
ओतूर, ता. १९ : येथील चिल्हेवाडी मार्गावर पिकअप व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
हा अपघात रविवारी (ता. १९) सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला असून, त्यात दुचाकीस्वार उमेश हरिभाऊ गोफणे (वय ३५, रा. गोंदेवाडी, ओतूर, ता. जुन्नर) हा जागीच ठार झाल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली. ओतूर-चिल्हेवाडी मार्गाने चिल्हेवाडी मार्गाने पिकअप ओतूरकडे येत असताना उमेश गोफणे हे दुचाकीने ओतूरकडून गोंदेवाडीकडे जात असताना चारपडाळी येथे पिकअप व दुचाकीचा अपघात झाला. त्यात दुचाकीस्वार उमेश गोफणे जागीच ठार झाला.