माळशेज घाटात दरड कोसळली

माळशेज घाटात दरड कोसळली

Published on

ओतूर, ता. १८ : पुणे, ठाणे व नगर जिल्हाच्या सरहद्दीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पुणे आणि ठाणे जिल्ह्यात जोडणाऱ्या नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी (ता.१८) सकाळी दरड कोसळली. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात महामार्गावर राडारोडा पसरला. यावेळी येथून जात असलेल्या टेम्पोचे ही थोडे नुकसान झाले. दरड कोसळल्यामुळे येथे एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.
माळशेज घाट परिसरात गेल्या पाच सहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या दरडी कोसळत आहेत. दरवर्षीप्रमाणे प्रशासन ही माळशेज घाटातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सज्ज आहे. वाहनचालकांनी माळशेज घाटात प्रवास करताना कोठे ही विनाकारण वाहन उभे करू नये. तसेच धुक्या मध्ये लाइट लावून शक्यतो समुहाने एका मागे एक गाड्या पास कराव्या असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

04446

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.