उदापूर येथे बिबट्या पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश

उदापूर येथे बिबट्या पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश

ओतूर, ता.११ : उदापूर (ता.जुन्नर) येथील काळभैरवनाथनगर (वाकोबा वस्ती) येथे लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (ता. १०) रात्री १० वाजता बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

उदापूर तसेच नदी परिसरात बिबट्याकडून भटक्या कुत्र्यासह पाळीव प्राणी लक्ष्य केले जात आहे. मानवी वस्तीतही सध्या बिबट्याचा वावर वाढला. यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे ओतूर वनविभागाने गुरुवारी (ता.९) दुपारी चार वाजता पिंजरा लावला होता. त्यात शुक्रवारी रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
बिबट जेरबंद झाल्यानंतर विशाल शिंदे, जालंधर शिंदे, नितीन शिंदे, तुषार शिंदे, अमित डोके, संतोष माळवे, शुभम शिंदे, सचिन माळवे, संकेत शिंदे, दत्ता बटवाल यांनी वनविभागाला बिबट जेरबंद झाल्याची माहिती दिली. तसेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर होईपर्यंत पिंजऱ्याजवळ थांबून राहिले. ओतूर वनक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधाकर गीते, वनरक्षक सुदाम राठोड, वनकर्मचारी किसन केदार, तुकाराम जाधव, गंगाराम जाधव, गणपत केदार यांच्या व पथकाने घटनास्थळी जाऊन सदर बिबट्या पिंजऱ्याचा ताब्या घेतला.


05639

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com