पिपंळगाव जोगातून पुष्पावती नदीत विसर्ग

पिपंळगाव जोगातून पुष्पावती नदीत विसर्ग

ओतूर, ता.२३ : पिपंळगाव जोगा (ता.जुन्नर) येथील धरणातून पुष्पावती नदीत १२०० क्यूसेकने गुरुवारी (ता.२३) पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभागा क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर व उपविभागीय अभियंते रवींद्र हांडे यांनी दिली.
पिंपळगाव जोगा धरणातून पुष्पावती नदीत पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यावेळी या नदीवर डिंगोरे, उदापूर, ठिकेकरवाडी व पुढील भागातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे काही ढापे खुले करण्याचे काम कुकडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर बंधाऱ्यांना पाण्याच्या दाबाने फुटण्याचा किंवा वाहून जाण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पुष्पावती नदीवरील बंधाऱ्याचे काही ढापे काढण्यात आले.
पिपंळगाव जोगा धरणातून पुष्पावती नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पिंपळगाव जोगा, दत्तवाडी, डिंगोरे, मांदारणे, उदापूर, नेतवड, माळवाडी, ठिकेकरवाडी, हिवरे या परिसरातील पाळीव दुभत्या प्राण्या बरोबरच, भटक्या व जंगली वन्य प्राण्याचा पाणी पिण्याचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागला आहे.
पुष्पावती नदीत पाणी सोडल्यामुळे लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केलेली उन्हाळी पिके व भाजीपाला वर्गीय नगदी पिकांना जीवदान भेटले असून, ऐन मे महिन्यात पाण्याचे आवर्तन नदीत सोडल्यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक व मेंढपाळांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.

सध्या शेतकऱ्यांनी शेतात टोमॅटो, गाजर, मिरची, कोबी, फ्लॉवर, बीट, भेंडी, गवार ही नगदी पिके तर केळी, ऊस आदी पिकांना पुष्पावती नदीतील पिंपळगाव जोगा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या आवर्तनाने जीवदान मिळणार आहे. तसेच ऐन उन्हाळ्यात परिसरातील विहिरींची पाणी पातळी स्थिर राहण्यास मदत होणार आहे.


पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठ्यातून पुष्पावती नदीत प्रथम मंगळवारी ८०० क्यूसेकने व आता वाढवून १२०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदी वरील बंधाऱ्याचे काही ढापे काढण्यात आले आहे. हे आवर्तन कमीत कमी २० दिवस सुरू राहणार असून यामुळे येडगाव धरणात पाणीसाठा होऊन पुढे कुकडी डावा कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू राहण्यास मदत होणार आहे.
- रवींद्र हांडे, उपविभागीय अभियंते, कुकडी पाटबंधारे विभाग


05676

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com