उदापूरमध्ये डेंगी सदृश रुग्णांमुळे खळबळ

उदापूरमध्ये डेंगी सदृश रुग्णांमुळे खळबळ

ओतूर, ता. ५ ः उदापूर (ता.जुन्नर) येथे गेल्या महिन्याभरात तीस ते चाळीस पेक्षा जास्त डेंगी सदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहे. यातील बहुतेक रुग्ण ओतूरमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही उपचार घेऊन बरे झाले आहेत. काहींना उपचारासाठी पुणे, मुंबई येथे स्थलांतर केले. त्यामुळे उदापूर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

उदापूरचे सरपंच सचिन आंबडेकर व ग्रामसेवक एम. जी. कवडे म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीकडून मागील आठवड्यात औषध धुरळी करण्यात आली आहे. प्रत्येक रविवार कोरडा दिवस पाळला जात आहे. तसेच गावात स्वच्छता मोहीम ही राबवली जाणार आहे.’’
सामाजिक कार्यकर्ते अजित माळवे म्हणाले, ‘‘आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करावी. चार दिवसांत उदापूरमधील सारनाथनगरमध्ये पाचपेक्षा जास्त रुग्ण डेंगी सदृश आजाराने बाधित रुग्ण आढळले. पाऊस सुरू झाल्यावर यात वाढ होऊ शकते.’’

पुन्हा उदापूरचे सर्वे करू
जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीहरी सारोक्ते म्हणाले, ‘‘उदापूर येथे डेंगी सदृश, इतर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून घरोघर जाऊन तीन वेळा सर्वे करण्यात येत आहे. त्याचबरोबर परिसरात साठवणूक पाण्यामध्ये डासांची पैदास करणारी अंडी, अळी, कोश नष्ट केले आहे. तसेच डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आशा सेविका व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सूचना केल्या आहे. तर आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीला औषध फवारणीतबाबत सूचना केल्या आहेत. त्यांनीही फवारणी केली आहे. उदापूर गावात परत एकदा आरोग्य विभागाकडून सर्वेचे काम सुरू करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com