ओतूर येथे कपर्दिकेश्‍वर यात्रोत्सवानंतर स्वच्छता अभियान

ओतूर येथे कपर्दिकेश्‍वर यात्रोत्सवानंतर स्वच्छता अभियान
Published on

ओतूर, ता. २७ : ओतूर (ता. जुन्नर) येथील कपर्दिकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त शिवलिंगावर तयार केलेल्या कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. तसेच यावेळी भरणाऱ्या यात्रेनिमित्त व्यावसायिकांची मोठी गर्दी असते. यात्रेनंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा पडलेला असतो. तो पडलेला कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविले.
हे स्वच्छता अभियान अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व ओतूर ग्रामपंचायतच्या स्वच्छता विभागाकडून मंगळवारी राबवून यात्रा परिसर स्वच्छता केला. कपर्दिकेश्वर यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक भेट देतात यात्रा चैतन्यवेशीपासून मंदिरापर्यंत भरते या परिसराचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवून पाच ट्रॉली एवढा कचरा स्वयंसेवकांनी यात्रा परिसरातून गोळा केला.
या स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांबरोबरच ग्रामपंचायत ओतूर चे स्वच्छता कर्मचारी ही या अभियानामध्ये सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com