ओतूर परिसरात पारंपरिक वाद्यांचा गजर

ओतूर परिसरात पारंपरिक वाद्यांचा गजर
Published on

ओतूर, ता.३ : जुन्नर तालुक्यातील ओतूर, उदापूर, डिंगोरे, नेतवड, माळवाडी, मांदारणे व परिसरातील गावांमध्ये बुधवारी भाद्रपदी बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या बैलपोळा सणा निमित्त सर्वच गावातून बैलांची आकर्षक सजावट करून ढोल, ताशा, तुतारी आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढली होती तर कित्येक ठिकाणी डिजेचा दणदणाट ही होता.
ओतूर येथे वाड्या वस्त्यावरील शेतकरी आपल्या बैलाना सजवून वाजतगाजत गावातून मिरवणुक काढतात.ओतूर येथे श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था, जय बजरंग प्रतिष्ठान व ग्रामस्थांकडून बैल सजावट स्पर्धा आयोजित करून पांढरी मारुती मंदिरासमोर सजवून मिरवत येणाऱ्या प्रत्येक बैल जोडीचे स्वागत करून बैल जोडी मालक शेतकऱ्यांचा फेटा बांधून सन्मान केला गेला तसेच प्रोत्साहन पर रोख रक्कम बक्षिस म्हणून दिली गेली. तसेच यावेळी देखण्या व रुबाबदार प्रथम चार बैल जोडीचे नंबर काढून त्यांना दसऱ्याच्या दिवळी साहित्य रूपी बक्षीस ही दिले जाणार आहे.

06264

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com