नवरात्रोत्सावातील रात्रीचे कार्यक्रम रद्द
ओतूर, ता.९ : ओतूर (ता.जुन्नर) व परिसरातील गावांमध्ये बुधवारी दुपारी जोरदार पावस पडला. ओतूर शहरातील रस्त्यावर तसेच इतर गावा आणि शेत शिवारात ही मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाले होते. काही ठिकाणी नवरात्रोत्सवातील रात्रीचे मनोरंजनाचे व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
ओतूर शहरात नेहमी प्रमाणे पाऊस झाल्यावर रस्त्यांना डबक्याचे स्वरूप आले होते तर ओतूर बसस्थानक मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. बुधवारी अचानक झालेल्या या पावसाने ओतूर व परीसरातील गावांमधील शेतीची धांदल उडाली असून काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सोयाबीन भिजले आहे तर खूपशा शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला या पावसामुळे मोठा फटका बसणार असून सोयाबीनच्या शेगा काळ्या पडून गुणवत्ता खराब होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
ओतूर व परीसरातील उदापूर, मांदारणे, चिल्हेवाडीत, पाचघर, रोहकडी, आंबेगव्हान, धोलवड, टिकेकरवाडी, खामुंडी, डुंबरवाडी, डिंगोरे, कोळवाडी, वाटखळे, पिंपळगाव जोगा या व इतर गावात मुसळधार पाऊस झाला असून कित्येक ठिकाणी पाणीच पाणी साचले.
06295
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

