

ओतूर, ता.१७ : ओतूर (ता.जुन्नर) येथील पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान दुधाची वाहतूक करणाऱ्या पिकअपमध्ये गावठी हातभट्टीचा दारूसाठा पकडला. यामध्ये अंदाजे चार लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.
ओतूर पोलिसांकडून आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नगर-कल्याण महामार्गावर खुबी येथे नाकाबंदी चालू असून त्यादरम्यान बुधवारी (ता.१६) सकाळी ही कारवाई केली आहे. यामध्ये दत्तात्रेय शिवाजी काळे (वय ५०, रा.पिंपळवंडी ता.जुन्नर), यशवंत गुना रढे व रमेश पुनाजी कारभळ (दोघे रा.सावरणे ता. मुरबाड, जि. ठाणे), सुभाष बाबूराव नवले (रा. पारगाव, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी संदीप भोते यांनी फिर्याद दिली.
खुबी येथे नाकाबंदी सुरू आहे. यादरम्यान बुधवारी कल्याणकडून नगरकडे जाणाऱ्या दूध वाहतुकीचे पॅक बॉडी असलेली पांढऱ्या रंगाची पिकअप विषयी (क्रमांक एम. एच.१४ एच. यू. ८७६४) संशय आल्याने पोलिस कर्मचारी संदीप भोते, सुभाष केदारी व इतर सहकारी यांनी अडविली व कसून तपासणी केली असता सदर पिकअपमध्ये गावठी हातभट्टी दारू आढळून आली. यावेळी पिकअप चालक काळे योन ही गावठी हातभट्टीची दारू यशवंत रढे व रमेश कारभळ यांच्याकडून सावरणे (ता.मुरबाड) येथून आणून पारगाव (जुन्नर) येथील सुभाष नवले यांच्याकडे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. यामुळे ओतूर पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला.
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बाळशिराम भवारी हे करीत आहे.
06329
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.