ओतूरला बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी
ओतूर, ता. ११ : ओतूर (ता. जुन्नर) येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघड्यावर प्रात:विधी (शौच) करणाऱ्या एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला करून त्यास जखमी केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
गुरुनाथ किसन वाघ (वय २७, रा. कातकरी वस्ती, ओतूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत वनविभागाला ओतूरचे सरपंच प्रशांत डुंबरे यांनी माहिती दिली. सदर व्यक्तीस ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीच्या उजव्या खांद्यावर बिबट्याचा एक दात लागला असून डाव्या हाताला पंजा लागल्याने खरचटल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी वनविभागाकडून नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरची वनपाल एस. एम. बुट्टे, वनरक्षक व्ही. ए. बेले, वनकर्मचारी किशन केदार, फुलचंद खंडागळे, साहेबराव पारधी यांनी सदर ठिकाणी पिंजरा लावून स्वसंरक्षणार्थ उपाययोजनेची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

