मोटार-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

मोटार-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू
Published on

ओतूर, ता. ७ : मोटार आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू छाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. उदापूर (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर हॉटेल निमंत्रणसमोर सोमवारी (ता. ६) रात्री ही सव्वादहाच्या दरम्यान घटना घडली. दरम्यान, कल्याण-अहिल्यानगर महामार्ग हा जुन्नर तालुका हद्दीतील नागरिकांसाठी मृत्यूचा सापळाच ठरत आहे. या मार्गावर दुभाजक टाकावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दुचाकीवरील प्रेम भरत घोडेकर (वय २५, रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) असे मृताचे नाव असून, मोटारीतील यश चव्हाण (वय ३५, रा. शिरोली, ता. जुन्नर) हा गंभीर जखमी झाला आहे.
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ओतूरकडून कल्याणच्या दिशेने जाणारी दुचाकी व कल्याणकडून ओतूरच्या दिशेने येणारी मोटार यांची उदापूर गावच्या हद्दीत हॉटेल निमंत्रणसमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील प्रेम घोडेकर हा तरूण जागीच ठार झाला. तर कारमधील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एल. जी. थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, शामसुंदर जायभाये यांनी घटनास्थळी हजर होऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून दूर करून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाजवळील गतिरोधकावरून पडून दुचाकीस्वार प्रदीप भुजबळ (वय ४५) हे जखमी झाले आहेत. या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com