

ओतूर, ता. ८ : ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिक्षिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी शेतामध्ये काम करत असलेल्या काही ऊसतोड कामगार महिलांना अतिशय सन्मानाने व्यासपीठावर बोलावून त्यांचा यथोचित सत्कार केला. या सत्कारामुळे या कष्टकरी महिला अक्षरश: भारावून गेल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका राजश्री भालेकर होत्या.
यावेळी प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब खाडे, व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रदीप गाढवे, संजय हिरे, अनिल उकिर्डे, सुशीला गावडे, विजया गडगे, वनिता भोर, आसावरी गायकर, अशा गिते, सोनाली माळवे, सोनाली कांबळे, आशा डुंबरे, अश्विनी नलावडे, तनुजा थोरात, निर्मला डोंगरे, सुजाता राऊत, अनुराधा इसकांडे, साक्षी देशमुख, सुनीता ताजवे, अनिता कदम, रूपाली तांबे, तेजल तांबे आणि ऊसतोड कामगार महिला उपस्थित होत्या.
संतोष कांबळे व संतोष सोनवणे यांनी सर्व महिलांचा परिचय व सत्काराचे नियोजन केले. विद्यालयातील राजनंदिनी घोलप, अनुप्रिया डुंबरे, भूमी ठिकेकर, वरद डोंगरे, चिन्मय डुंबरे, ज्ञानेश्वरी थोरात, मंजिरी मुरादे, प्रार्थना तांबे या विद्यार्थ्यांनी व विद्यालयाच्या माजी क्रीडा शिक्षिका सुशीला गावडे, बी. आर. खाडे, राजश्री भालेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक शरद माळवे, राजाराम शिंदे, मंगेश तांबे, प्रमोद जाधव, बाळासाहेब साबळे, मिलिंद खेत्री, लक्ष्मण दुडे, ज्ञानेश्वर वळे, देवचंद नेहे, अमित झरेकर, अनिल जवरे, दिनेश ताठे, हर्षल शितोळे, विजय खरात, मयूर जाधव, प्रसन्न तांबे, योगेश फापाळे, ईश्वर ढमाले, अरविंद आंब्रे, तेजस ढमाले, दीपक हांडे यांनी परिश्रम घेतले.
विशाल चौधरी यांनी प्रस्ताविक केले. अजित डांगे यांनी सूत्रसंचालन केले. वनिता भोर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.