बिबट्याच्या हल्ल्यात ओतूरला तरुण जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात 
ओतूरला तरुण जखमी
Published on

ओतूर, ता. १२ : येथील ओतूर- पानसरेवाडी मार्गावर मंगळवारी (ता. १२) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात स्वप्नील संजय डुंबरे (वय ३०, रा. इस्कांडेबन, ओतूर, ता. जुन्नर) हा दुचाकीस्वार जखमी झाला.
याबाबत स्थानिकांनी माहिती दिली की, अशी की स्वप्नील डुंबरे हा मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून ओतूर येथून पानसरेवाडी मार्गे इस्कांडेबन येथे घरी चालला होता. त्याच वेळी रस्त्याच्या बाजूच्या शेतातून बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यात बिबट्याने त्याच्या पायाला पंजा मारल्याने जखम झाली. त्याला उपचारासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी त्याच्यावर उपचार केले.
या घटनेची माहिती ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर ओतूर वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, दादाभाऊ साबळे, किसन केदार, गणपत केदार, फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव, रोहित लांडे यांच्या पथकाने जखमी तरुणाची भेट घेतली. त्यास पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे घेऊन गेले. तसेच, ज्या ठिकाणी तरुणावर बिबट्याने हल्ला केला त्या परिसरात पाहणी केली. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, तसेच इतर उपाययोजना राबविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com