

ओतूर, १२ : ओतूर (ता.जुन्नर) येथील वनपरिक्षेत्र हद्दीमधील वाटखळे, सितेवाडी, पिंपरी पेंढार, बेल्हे, आळे, राजुरी गावामधील पाणवठ्यांमध्ये वन विभागाच्या वतीने पाणी सोडण्यात आले. यामुळे पाणवठे भरले आहेत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.
वाटखळे परिसरातील प्राणी, पक्ष्यांना तीव्र उन्हामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वन्यप्राण्यांत वानर, तरस, कोल्हा, बिबट, सांबर, भेकर, ससा, घार, रान मांजर, बड,होला, मोर, रानडुक्कर, टिटवी, उदमांजर, चिंकारा आदी प्राणी आहेत. त्यांची कडक उन्हात तहान भागावी म्हणून जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनरक्षक स्मिता राजहंस यांच्या पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी ठोकळ यांनी ओतूर वनपरिक्षेत्र हद्दीत ठीक ठिकाणच्या एकूण १२ कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात पाणवठे भरल्याने प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती आणि वन्यप्राण्यांची तहान भागवली जाणार
आहे.
जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते सखाराम पोपट लामखेडे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून बारा हजार लिटर पाणी टँकरच्या माध्यमातून खामुंडी येथील कृत्रिम पाणवठ्यात सोडले, अशी माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी ठोकळ यांनी दिली.
06913
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.