उद्धट येथील घरांत पाणी
शिरून रहिवाशांचे नुकसान

उद्धट येथील घरांत पाणी शिरून रहिवाशांचे नुकसान

उद्धट, ता. १० ः उद्धट (ता. इंदापूर) येथे गेल्या दिवसांत पावसामुळे उद्धट गावांमधील सुमारे दहा घरांत पाणी शिरले. उद्धट येथे सांयकाळी पाच ते सहाच्या भरपूर पाऊस झाला. त्यामध्ये ओढ्याला भरपूर पाणी वाहून गावामध्ये आले. परंतु, गावामधील ओढ्याचे पात्र अरुंद असल्याने ओढ्या नजीकच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्याचा फटका रहिवाशांना बसला.
या ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरणासाठी पाटबंधारे विभागाकडून तीन ओढे यांचे रीतसर निविदा काढून एका व्यक्तीला दिला. त्याने दोन छोट्या ओढ्यांचे काम पूर्ण केले व त्या पोटी ४० टक्के रक्कम त्याद्वारे उचलली. परंतु, मोठ्या ओढ्याचे काम सुरू केले असता, काही ग्रामस्थांनी अडवणूक केली. ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम बंद पडले. ठेकेदाराला माघारी पाठवले.
उद्धट गावांमधील रहिवासी विकास सावंत, सिद्दीक शेख, बाळासाहेब मदने, तात्यासो जाधव, सुधीर शिंदे, अशोक अस्वरे, भिकाबाई आढागळे, पंकज जाधव, रमेश सदाफुले, राजेंद्र साळवे, संतोष नेटके या ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले. याची भरपाई पाटबंधारे विभागाकडून लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

अभियंत्यांनी फोन नाही उचलला
सनसर येथील जलसंपदा विभागामधील अभियंता संतोष वणवे यांना याविषयी विचारणा करण्याचे हेतूने फोन केले असता त्यांनी ते दोन दिवस उचलले नाहीत. त्यांनी कामात हलगर्जीपणा करून ते काम बंद ठेवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com