इंदापूर तहसील कार्यालयात
माहिती अधिकार दिन साजरा

इंदापूर तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा

Published on

उद्धट, ता. ४ : इंदापूर तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा झाला. राज्यपातळीवर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु शनिवारी (ता. २८) शासकीय सुट्टी असल्याने हा दिन सोमवारी (ता. ३०)साजरा करण्यात आला.
‘‘जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना माहिती अधिकाराच्या प्राप्त झालेल्या अर्जावर सकारात्मक पाहण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आलेल्या अर्जाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गांधले गुरुजी यांनी केले.
इंदापूर तहसीलदार जिवन बनसोडे म्हणाले की, या कायद्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेले शासन निर्णय सर्वांनी पाहावेत. त्यानुसार काय करायला नको, यावर भर द्यायला हवा. जाणूनबुजून माहिती देण्यास टाळाटाळ करू नये. एका वेळेला एका अर्जातून एकाच प्रकारची माहिती द्यावी. पहिल्या क्रमांकाची माहिती यामध्ये देणे आवश्यक आहे. कायद्यातील तरतुदी पाहून सकारात्मक दृष्टिकोनातून अर्जावर कार्यवाही करावी आणि असे अर्ज निर्गत करावेत. शासनाने वेळोवेळी प्रकाशित केलेले शासन निर्णय त्यामधील तरतुदी आणि सकारात्मक उद्देश ठेवून अशा अर्जांचे वेळेत निराकरण होईल, हे पाहावे. कायद्यामध्ये डोकावल्यास प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळेल, हीच सकारात्मक बांधिलकी प्रशासनात असावी.
याप्रसंगी पुरवठा निरीक्षक अनुप बनसोड, अप्पासाहेब सपकळ, संघटक शत्रुघ्न घाडगे, अजीजभाई तांबोळी यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com