

उद्धट, ता. २२ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांब (ता. इंदापूर) येथे ‘मतदान जनजागृती अभियाना’चे आयोजन शनिवारी (ता. १९) केले होते. नोव्हेबर महिन्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी शंभर टक्के मतदान करून देशाचे जागरूक नागरिक व्हावे, यासाठी जिल्हा परिषद शाळेकडून मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यामध्ये मतदार जनजागृती रॅली, तसेच मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, सोडा सारे काम धाम मतदान करणे पहिले काम यासारख्या घोषणा देत, १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांनी मतदान करून देशाचे जागरूक नागरिक बनण्याची विनंती बालचमुंकडून करण्यात आली. त्यानंतर मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली.
या दरम्यान मतदान जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धेचे शाळेमध्ये आयोजन केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता शेंडगे यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमांमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच शाळेतील शिक्षक बबनराव आटोळे सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.