बंद ‘टपाल’मुळे लाडक्या बहिणींची गैरसोय

बंद ‘टपाल’मुळे लाडक्या बहिणींची गैरसोय

Published on

उद्धट, ता. ८ : टपाल कार्यालय बदलत आहे, हे चित्र जरी सुखावणारे वाटले असेल परंतु त्याचे पडसाद आता सणासुदीच्या दिवसांमध्ये दिसून येत आहेत. टपाल कार्यालयात सुसूत्रता आणण्यासाठी अत्याधुनिक एपीटी २.० हे सॉफ्टवेअर कार्यान्वित केले असून नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोय जास्त होत आहे.
सध्या टपालामध्ये पीएम किसान, लाडकी बहीण योजना, बचत खाते तसेच पैसे भरणे व काढणे हे लाभ खातेधारकाला दिले जातात. परंतु, मागील काही दिवसापासून या योजना पूर्णतः ठप्प आहे. टपालामध्ये संपर्क साधला असता, ही सुविधा पूर्ववत व्हायला अंदाजे चार ते पाच दिवसांचा अवधी लागणार आहे. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर टपालाने राख्या पाठवल्या जातात. त्यामुळे या राख्या वेळेवर मिळणार का असा प्रश्न बहिणींना पडला आहे. ऑनलाइन सुविधा सॉफ्टवेअर प्रणालीत अनेक बदल असल्यामुळे पूर्वीचे जे अधिकारी आहेत त्यांना देखील नवीन प्रणालीचे बदल लवकर समजत नसल्याने त्यामध्ये बराचसा काळ जात आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे

जनतेची गरज व संपूर्ण सेवेची अपेक्षा लक्षात घेता टपाल कार्यालयाने २०२५ मध्ये जगाच्या बरोबरीनं चालता येईल एवढं सुधरावे, अशी अपेक्षा आहे.
- अजित देशपांडे, संस्थापक सदस्य, राष्ट्रीय अल्पबचत अभिकर्ता संघ, भारत (एनएसएसएएआय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com