

उद्धट, ता. १९ ः घोलपवाडी (ता. इंदापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले. श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान घोलपवाडी व गणेश तरुण मंडळ घोलपवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवातील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करून हातात भगवा ध्वज घेत ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली होती. या कार्यक्रमास छत्रपतीचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, विद्यमान संचालक पृथ्वीराज घोलप यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. संध्याकाळी महाराजांचा पाळणा व आरतीचा कार्यक्रम पार पडला. शनिवारी (ता. २१) सावता केशव फुले यांचा रंगीत संगीत सोंगी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.