उंडवडी सुपेत बाल वारकरी संस्कार शिबिराची सांगता उत्साहात

उंडवडी सुपेत बाल वारकरी संस्कार शिबिराची सांगता उत्साहात
Published on

उंडवडी, ता. २० : स्पर्धेच्या युगात बालक व तरुण पिढी व्यसन, हिंसाचार, फॅशन, भ्रष्टाचार आदी कुसंस्कारांनी ग्रस्त बनत चालली आहे, त्यांना कुसंस्कारातुन मुक्त करण्यासाठी सुसंस्कार देणे, गरजेचे आहे. ही काळाजी गरज ओळखून आपली भावी पिढी सुशिक्षित, सुसंस्कारीत बनावी व आदर्श समान राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे ऋषीकेश महाराज गवळी यांच्या वतीने १४ दिवसीय बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. केशव महाराज हगवणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या शिबिराची सांगता झाली.

उंडवडी सुपे येथील ग्रामपंचायतीचे बहूद्देशीय सभागृहात १४ दिवसीय बाल संस्कार शिबिरास ७ मे रोजी सुरूवात झाली होती. या शिबिरात उंडवडी सुपेसह देऊळगाव रसाळ, सोनवडी सुपे, कारखेल, उंडवडी कडेपठार, खराडेवाडी, जराडवाडी आदी परिसरातील ४५ ते ५० चिमुकले विद्यार्थी सहभागी झाले होते.

या शिबिरात हरिपाठ, नित्याचे श्लोक, गीता सहिंता, टाळ, वारकरी पावल्या, पखवाज, भजन, हार्मोनिअम, आदर्श दिनचर्या, मातृदेवो भव, पितृदेवो भव, भारतीय संस्कृती, शूरवीर संत कथा आदी विषय विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. यामध्ये मुलांना सकाळचा नाष्टा, दुपारी भोजन, व संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था उंडवडी सुपे येथील भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती.

तसेच यावेळी मोहन यादव, मनोज वाबळे, अण्णा बराटे, सूरज जराड, प्रतीक कोळेकर, अण्णा जराड, प्रतीक शेलार, विश्वनाथ धस, शैला बागाडे, संजय वाबळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. बाल संस्कार शिबिराची सांगता केशवजी महाराज हगवणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने केल्याची माहिती ऋषीकेश महाराज गवळी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com